Nashik : नाशिक रुग्णालयात पोहोचल्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, परिस्थिती पाहून बसला धक्का
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्राला प्राप्त झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
नाशिक, 05 ऑक्टोबर : नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याच्या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाशिकमध्ये पाहणी दौरा केला. यावेळी नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात भारती पवार यांनी पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील औषधसाठा, बेड्सची संख्या, रुग्णसंख्या, रुग्णांवरील उपचारासंदर्भात विचारपूस आणि आढावा घेतला.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात भारती पवार यांच्या पाहणीत धक्कादायक माहिती समोर आले आहेत. जिल्हा रुग्णालयात केवळ महिनाभर पुरेल इतकीच औषधे आहेत. याबाबत विचारले असता रुग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितले की, औषध खरेदी करणाऱ्या कंपनीला वारंवार पत्र व्यवहार करूनही उत्तर नाही. तसंच जिल्हा रुग्णालयासह संदर्भ रुग्णालयातील अनेक मशनरी देखील बंद आहेत. रुग्णालयामध्ये इतर सोयीसुविधांचीही वानवा आहे. रुग्णालयाचा आयसीयू विभाग केवळ लिफ्ट नसल्याने बंद आहे. या आयसीयू विभागात ८० बेड आहेत. यासह इतर समस्यांचा पाढा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यासमोर वाचला.
advertisement
नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्राला प्राप्त झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. औषध साठा पुरेसा होता, औषध नसल्याने मृत्यू झाले नाही. मृत्यू झालेल्या काही रुग्णांचं वय जास्त होते. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयातून दाखल झाले होते. काही नवजात बालक खाजगीत व्हेंटिलेटरवर होते, ते शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक अहवालात माहिती, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत केली आहे. तसंच दुसरा सविस्तर अहवाल लवकर येईल असंही भारती पवार यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2023 11:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik : नाशिक रुग्णालयात पोहोचल्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, परिस्थिती पाहून बसला धक्का


