TRENDING:

१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावात.., फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

Last Updated:

Village Cement Concrete Road : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाहतूक सुविधा मजबूत करण्यासाठी सरकारकडून मोठ्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाहतूक सुविधा मजबूत करण्यासाठी सरकारकडून मोठ्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026–27 च्या अर्थसंकल्पात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यापासून ते मोठ्या शहरांतील मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांपर्यंत विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.
Village Cement Road
Village Cement Road
advertisement

हजारो गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा कार्यक्रम

राज्यातील १ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना मजबूत काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा मोठा कार्यक्रम सरकार राबवणार आहे. या योजनेसाठी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून या प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेचे आर्थिक सहाय्य घेतले जाणार आहे. ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ करण्यासोबतच शेतमालाची वाहतूक आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

advertisement

पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग विस्ताराला मंजुरी

पुणे आणि लोणावळा दरम्यान वाढत्या रेल्वे वाहतुकीचा विचार करून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गिकेमुळे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे परिसराला मोठा फायदा होणार आहे. उद्योगधंद्यांच्या वाहतुकीसाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला गती

पुणे महानगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या भागांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड या भागाला मंजुरी देण्यात आली आहे.

याशिवाय पुणे शहरातील रामवाडी ते वाघोली दरम्यान सुमारे ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच येरवडा ते कात्रज आणि हिन्जवडी ते सिंहगड रोड या सुमारे ५४ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भुयारी मेट्रो मार्गासाठी व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

advertisement

शक्तिपीठ महामार्ग आणि द्रुतगती मार्ग प्रकल्प

पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय कल्याण ते लातूर दरम्यान ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पुणे ते शिरूर या ५३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गासाठी सुमारे ७ हजार ५१४ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. तळेगाव ते चाकण दरम्यान उन्नत मार्गाचे कामही सुरू करण्यात येणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान जलद प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या सुमारे १९२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज एमआयडीसी दरम्यान उन्नत मार्ग दोन टप्प्यांत उभारला जाणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावात.., फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल