TRENDING:

BJP Congress Alliance : पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?

Last Updated:

Congress BJP Alliance : आता पुन्हा एकदा भाजप काँग्रेसची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असल्याने आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

advertisement
जळगाव: काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसच्या युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती. या युतीची चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने अंबरनाथमधील आपल्या सगळ्याच १२ नगरसेवकांचे निलंबन केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप काँग्रेसची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असल्याने आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
advertisement

रावेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत अत्यंत धक्कादायक राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कट्टर विरोधक असलेले भाजप आणि काँग्रेस सत्तेसाठी एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.

सत्तेची गणितं आणि काँग्रेसची 'किंगमेकर' भूमिका

रावेर नगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने 'सत्तेची चावी' अवघ्या दोन जागा असलेल्या काँग्रेसच्या हाती आली आहे. भाजपकडे ९ अधिक २ अपक्ष असे ११ नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे १० नगरसेवक आहेत. तर, काँग्रेसकडे २ नगरसेवक असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एक नगरसेवक आहे.

advertisement

भाजपला सत्ता स्थापनेसाठी १२ नगरसेवकांच्या पाठबळाची गरज आहे. भाजपकडे स्वतःचे ९ आणि २ अपक्ष मिळून ११ नगरसेवक आहेत. अशा स्थितीत काँग्रेसच्या २ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यास भाजपचा आकडा १३ वर पोहोचेल आणि सत्तेचा मार्ग मोकळा होईल.

राजेंद्र चौधरींचे नाव निश्चित?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या गोटातून उपनगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र चौधरी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. काँग्रेसने भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा असून, तसे झाल्यास रावेरमध्ये एक वेगळाच राजकीय प्रयोग पाहायला मिळेल.

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हर्षालीने नोकरी सोडली आणि सुरू केला सिझनेबल बिझनेस, महिन्याला होते चांगली कमाई
सर्व पहा

दुसरीकडे, १० जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्तेसाठी फिल्डिंग लावली आहे. मात्र, काँग्रेसची भूमिका येथे 'किंगमेकर' ठरणार आहे. काँग्रेस भाजपला साथ देऊन राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवणार की अन्य काही चमत्कार घडणार, हे आज स्पष्ट होईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Congress Alliance : पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल