TRENDING:

देवाचा फोटो लावा, मेधा कुलकर्णी ठाम, पोलीस अधिकाऱ्याने फोटो हिसकावला, मंचरमध्ये दर्गा-मंदिर वाद पुन्हा पेटला

Last Updated:

हिंदू देवी देवतांचा फोटो लावण्यासाठी खासदार मेघा कुलकर्णी यांनी यावेळी आग्रह धरला. मात्र पोलिसांनी टताई तुम्ही असे करू नका' म्हणून विनंती केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी, आंबेगाव : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भात वाद पुन्हा उफाळून आला असून परिसरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे. आज राज्यसभा खासदार मेघा कुलकर्णी यांनी मंचर येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित दर्ग्याच्या बांधकामाबाबत प्रांत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समजत आहे.
मेधा कुलकर्णी
मेधा कुलकर्णी
advertisement

पोलीस अधिकाऱ्याने फोटो हिसकावला, मंचरमध्ये दर्गा-मंदिर वाद पुन्हा पेटला

हिंदू देवी देवतांचा फोटो लावण्यासाठी खासदार मेघा कुलकर्णी यांनी यावेळी आग्रह धरला. मात्र पोलिसांनी टताई तुम्ही असे करू नका' म्हणून विनंती केली. मात्र मेघा कुलकर्णी फोटो लावण्यावर ठाम असल्याचे पाहून पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी देवाचा फोटो मेघा कुलकर्णी यांच्या हातातून हिसकावून घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित दर्ग्याला कुलूप लावण्यात आले आहे.

advertisement

यावेळी दर्ग्याच्या आसपास राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबाकडे आधारकार्डची मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली. आम्ही यांना ओळखतो, असे काही नागरिक सांगत असतानाही मेधा कुलकर्णी यांनी जबरदस्तीने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. दोन तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आठ-दहा पोलीस कर्मचारी असतानाही मेधा कुलकर्णी यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने तेथे राहणाऱ्यांना प्रश्न विचारून त्यांना खडसावण्याचा प्रयत्न केला.

advertisement

मंचरमध्ये तणावपूर्ण आणि संवेदनशील वातावरण

या घडामोडींमुळे मंचर शहरात तणावपूर्ण आणि संवेदनशील वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मंचर येथील एका दर्ग्याच्या भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी खाली मंदिर असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला होता. या प्रकरणानंतर प्रशासनाने संबंधित दर्ग्याचे काम तात्पुरते थांबवले होते.

advertisement

दोन्ही समाजाकडून आरोप प्रत्यारोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आता मंचरमध्येच असलेल्या पांडवकालीन बारवही वक्फ बोर्डाने काबीज केल्याचा आरोप हिंदुत्व संघटनांनी केला आहे. तसेच या बारवाच्या शेजारी असलेला दर्गा अनधिकृत असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. दुसरीकडे मुस्लिम समाजाकडून मात्र दर्गा अधिकृत असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवाचा फोटो लावा, मेधा कुलकर्णी ठाम, पोलीस अधिकाऱ्याने फोटो हिसकावला, मंचरमध्ये दर्गा-मंदिर वाद पुन्हा पेटला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल