TRENDING:

ऑनलाईन गेम खेळून कर्ज, शाखाधिकाऱ्याने बनाव रचला, २५ लाख लुटले, स्वत:वर वार केले, पण पर्दाफाश झालाच!

Last Updated:

Dharshiv News: लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखाधिकार्‍याने २५ लाख रुपयांची रक्कम स्वतःजवळ ठेवून लुटीचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, धाराशिव: सोलापूर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखाधिकार्‍याने २५ लाख रुपये लुटल्याचा बनाव रचत स्वतःवर वार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून २५ लाख लुटल्याचा बनाव करणाऱ्या शाखाधिकाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे.
धाराशिव- लोकमंगल शाखाधिकारी बनाव
धाराशिव- लोकमंगल शाखाधिकारी बनाव
advertisement

कैलास घाटे असे या शाखाधिकाऱ्याचे नाव असून, त्याला ऑनलाईन गेम आणि खाजगी देणे झाले होते. त्याच कारणामुळे त्याने ही रक्कम स्वतःजवळ ठेवून लुटीचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना त्याने दिली आहे. धक्कादायक म्हणजे, चोरट्यांनी हल्ला केल्याचे भासवण्यासाठी त्याने स्वतःच्या अंगावर शस्त्राने वार करून घेतले होते.

२५ लाखांची रोकड चोरट्यांनी लुटल्याचा बनाव, स्वत:वर धारदार शस्त्राने वार करून घेतले

advertisement

नळदुर्ग येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा शाखाधिकारी कैलास घाटे याने ३० जून रोजी पोलिसांना माहिती दिली की, तो २५ लाख रुपयांची रोकड सोलापूर येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी दुचाकीवरून जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर चापला तांड्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला ओव्हरटेक करून डोळ्यात मिरचीची पूड फेकली. डोळ्यात मिरची गेल्याने घाटेने दुचाकी थांबवली असता, चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. घाटेने प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्याच्या छाती, पाठ आणि उजव्या खांद्यावर वार करून २५ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पलायन केल्याचा बनाव त्याने रचला होता.

advertisement

पोलिसांच्या तपासात शाखाधिकाऱ्याचा पर्दाफाश, गुन्ह्याची कबुली दिली

या घटनेनंतर नळदुर्ग पोलिस स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच हा तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात हा शाखाधिकारी उघडा पडला. शाखाधिकार्‍याकडून त्याने लपवलेली रक्कम ही जप्त केली असून त्याला अटक देखील केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऑनलाईन गेम खेळून कर्ज, शाखाधिकाऱ्याने बनाव रचला, २५ लाख लुटले, स्वत:वर वार केले, पण पर्दाफाश झालाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल