TRENDING:

Santosh Deshmukh : देशमुख हत्या प्रकरण तापलं, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले, आम्ही कुणालाही सोडणार...

Last Updated:

देशमुख हत्या प्रकरणातील आऱोपी गुजरातमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोपी कुठेही गेले असतील आणि मदत केली असतील तरी त्यांच्यावर कारवाई होतेय तुम्हाला दिसतेय. मदत करणाऱ्यालाही आम्ही सोडत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Santosh Deshmukh case, Devendra Fadnavis Reaction on Dhananjay munde:नागपूर : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी जोर धरतेय. या राजीनाम्यावर आता पहिल्यांदाच मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही वाचू देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
santosh deshmukh murder case
santosh deshmukh murder case
advertisement

देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये बोलत होते. नागपूरात भाजपचं सदस्यता नोंदणी अभियान सूरू आहे.या अभियानाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण बीड प्रकरणात सरकार पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहे. निर्धाराने कारवाई होणार आहे. या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही वाचू देणार नाही. या प्रकरणात जे दोषी आहे. जे जे दादागिरी करतात, हप्ते वसुली करतात त्या सगळ्यांवर जरब बसवायला सूरूवात केली आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

advertisement

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, अंजली दमानिया यांची कोणतीही तक्रार असेल. त्यांनी ही तक्रार पोलिसांना द्यावी.पोलीस या प्रकरणात कारवाई करतील,असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दमानिया यांना दिले.

देशमुख हत्या प्रकरणातील आऱोपी गुजरातमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोपी कुठेही गेले असतील आणि मदत केली असतील तरी त्यांच्यावर कारवाई होतेय तुम्हाला दिसतेय. मदत करणाऱ्यालाही आम्ही सोडत नाही. या संदर्भात नीट चौकशी होऊ दयावी. आम्ही कुठल्यागी दोषीला सोडणार नाही,असे फडणवीसांनी स्पष्टच म्हटलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरपंचाची निर्घृण हत्या झाली. त्यामुळे राजकारणासाठी या प्रकरणाचा उपयोग होऊ नये. समाजात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh : देशमुख हत्या प्रकरण तापलं, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले, आम्ही कुणालाही सोडणार...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल