मुंबईतील भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. मुंबईतील मरीन लाईन्स येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या भाजपच्या कार्यालयाच्या जागेवरून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. याप्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. भाजपानं राऊतांचे हे आरोप भाजपनं फेटाळलेत.
advertisement
भाजपने ऑफिससाठी महापालिकेची जागा हडपली. राफेलच्या वेगाने भाजप ऑफिसच्या इमारतीला परवानग्या देण्यात आल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. भाजपनं पैसे खर्च करून जागा विकत घेतली आहे. ज्यांना जागा बळकवण्याची सवय त्यांनी बोलू नये, असा पलटवार त्यांनी केला.
या कार्यालयाच्या मंजुरीबाबतची फाईल वेगाने फिरवून तात्काळ निर्णय घेण्यात आल्याचा दावा संजय राऊतांना केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यालयाबाबत गंभीर आरोप केलाय. सामान्य माणसाप्रमाणे सर्व परवानगी घेऊन कार्यालयासाठीची ही जागा घेतल्याचा दावा करत विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी खोडून काढलेत. भाजपच्या मुंबईतील या कार्यालयाचं भूमिपूजन पार पडत असतानाच त्यावर राजकीय आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी मात्र झडू लागल्यानं राजकारण तापले.
