TRENDING:

Vadhavan Port: मुंबई ते वाढवण प्रवास होणार सुसाट, वांद्रे-वर्सोवा सी लिंकबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

Last Updated:

Vadhavan Port: वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात प्रस्तावित खोल समुद्री बंदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी या बंदराच्या कामाचं भूमीपूजन केलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचं सध्या 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. पुढील दोन वर्षांत तो पूर्ण होईल. यासोबत सी लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचं काम सुरू आहे. वेस्टर्न एक्सप्रेस वे हा मुंबईतील 60 टक्के वाहतुकीचा भार उचलत आहे. हा भार कमी करण्यासाठी त्याला समांतर मार्ग जोडून सी लिंकपासून भाईंदर - विरारपर्यंत रस्ता तयार होत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता पुढे पालघरमधील वाढवण बंदरापर्यंत जाणार आहे.
Vadhavan Port: मुंबई ते वाढवण प्रवास होणार सुसाट, वांद्रे-वर्सोवा सी लिंकबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट
Vadhavan Port: मुंबई ते वाढवण प्रवास होणार सुसाट, वांद्रे-वर्सोवा सी लिंकबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट
advertisement

एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला क्रेडाईचे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमल, सचिव ऋषी मेहता, माजी सचिव धवल अजमेरा, मुख्य कार्यकारी अधिकारी केवल वलांभिया तसेच रिअल इस्टेट व्यवसायातील अनेक तज्ज्ञ उपस्थित होते.

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी लोकलमुळे होऊ शकतो खोळंबा; इथं पाहा मेगाब्लॉकचे वेळापत्रक

advertisement

वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात प्रस्तावित खोल समुद्री बंदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी या बंदराच्या कामाचं भूमीपूजन केलं होतं. या ऑफशोअर मेगा पोर्ट प्रकल्पाची संकल्पना एनएमआयएसचे फेलो सुरेंद्र शर्मा यांनी डिझाइन केली होती. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीकडे (जेएनपीए) या बंदराच्या बांधकामाची जबाबदारी आहे. वाढवण हे देशातील पहिले ऑफशोअर पोर्ट असेल ज्यामध्ये बंदर कृत्रिम बेटावर बांधलं जाईल. सी लिंकपासून भाईंदर - विरारपर्यंत जाणारा रस्ता या बंदरापर्यंत आल्यास कनेक्टिव्हीमध्ये मोठा फायदा होईल.

advertisement

बांधकाम क्षेत्रात अत्याधुनिक बदल आवश्यक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

फडणवीस यांनी बांधकाम क्षेत्रातील सुधारणांविषयी मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "जगभरात उपलब्ध असलेलं नवीन तंत्रज्ञान मुंबईत येणं गरजेचं आहे. बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे 80 मजली इमारत केवळ 120 दिवसांत बांधली जाऊ शकते." मुंबईत पुनर्विकासाबरोबरच झोपडपट्टी पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटमध्येदेखील नवीन संधी निर्माण होत आहेत. मुंबईत जगातील सर्वोत्तम वास्तुकला, आयकॉनिक इमारती, उत्कृष्ट सुविधा निर्माण होत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vadhavan Port: मुंबई ते वाढवण प्रवास होणार सुसाट, वांद्रे-वर्सोवा सी लिंकबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल