होय, त्या खासदाराच्या पीएचे डॉक्टरांना फोन, दबाव टाकला
गरकळ नावाचे मुकादम आहेत, ज्यांचे ट्रॅक्टर माजी खासदारांच्या कारखान्यावर आहेत. त्यांची काही बाकी शिल्लक होती. यावरून काहीसा वाद झाल्याने गरकळ यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना काहीही झाले नाही, ते पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) आहेत, यासाठी मृत महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला. खासदारांच्या स्वीय सहाय्यकाने महिला डॉक्टरला अनेक वेळा फोन केले, असे सांगत संबंधित गरकळ नावाच्या मुकादमांना धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर आणले. त्यांनीही आपल्यासमोर हे प्रकार घडल्याचे माध्यमांना सांगितले.
advertisement
ते हस्ताक्षर डॉक्टरचे नाहीत, त्या पोलिसांचे सीडीआर काढा, त्यांची चौकशी झालीच पाहिजे
महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही धनंजय मुंडे यांनी संशय घेतला. कुटुंबातील कुणीही लोक घटनास्थळी उपस्थित नसताना पोलिसांनी डॉक्टरांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवलाच कसा, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर त्यांचे नाहीच, असे त्यांच्या बहिणीचे म्हणणे आहे. एक बहीण दुसऱ्या बहिणीचे हस्ताक्षर अतिशय चांगल्यापणाने ओळखू शकते असे सांगत यासंदर्भात तक्रार देण्यासाठी कुटुंबीय ज्यावेळी साताऱ्याला गेले, त्यावेळी तिथे अनेक तास त्यांना बसवून ठेवण्यात आले, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
मी आता शासनाला स्वस्थ बसू देणार नाही
महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास जे पोलीस अधिकारी करीत आहेत किंबहुना ज्यांनी आत्महत्येनंतर तपास केला या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्ड काढण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. खासदाराच्या दोन पीएचा संबंध जोडला गेला आहे, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. महिला डॉक्टरच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी आता शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, असेही ते म्हणाले.
