TRENDING:

कापूस आणि कांद्याच्या दरात घसरण, सोयाबीन आणि तुरीला काय मिळाला भाव? Video

Last Updated:

22 जानेवारी रोज गुरुवारी राज्यातील कृषी बाजारात प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये पुन्हा चढ उतार पाहायला मिळाले आहे. कपाशी आणि कांद्याच्या बाजारभावात घसरण दिसून आली असून, सोयाबीनच्या दरात मात्र दिलासादायक वाढ नोंदवण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 22 जानेवारी रोजी गुरुवारी राज्यातील कृषी बाजारात प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये पुन्हा चढ-उतार पाहायला मिळाले आहे. कपाशी आणि कांद्याच्या बाजारभावात घसरण दिसून आली असून, सोयाबीनच्या दरात मात्र दिलासादायक वाढ नोंदवण्यात आली आहे. तर तुरीच्या दरांमध्ये चढ-उताराचा कल कायम आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला.
advertisement

कपाशीच्या दरात पुन्हा नरमाई

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या अहवालानुसार, आज राज्यातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 16 हजार 438 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. यामध्ये वर्धा बाजारात सर्वाधिक 7 हजार 700 क्विंटल कपाशीची आवक झाली. त्याठिकाणी कपाशीला किमान 7 हजार 803 तर कमाल 8 हजार 282 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक दर मिळाला. बुधवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज कपाशीच्या बाजारभावात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

Weather Alert : महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, आता येणार नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट

कांद्याच्या बाजारभावात घट

आज राज्यातील कृषी बाजारांत एकूण 2 लाख 59 हजार 130 क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात 84 हजार 738 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. या बाजारात कांद्याला किमान 570 ते कमाल 1 हजार 632 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चंद्रपूर बाजारात आवक झालेल्या कांद्याला 2 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. बुधवारी मिळालेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचे बाजारातील चित्र आहे.

advertisement

सोयाबीनच्या दरात वाढ

आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण 39 हजार 162 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये अकोला बाजारात 6 हजार 450 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. अकोला बाजारात सोयाबीनला किमान 4 हजार 790 ते कमाल 5 हजार 398 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पिवळ्या सोयाबीनला वाशिम बाजारातच 5 हजार 850 रुपये प्रतिक्विंटल असा उच्च दर मिळाला. बुधवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात वाढ नोंदवण्यात आली आहे.

advertisement

तुरीच्या दरात घसरणीचा कल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि कांद्याच्या दरात घसरण, सोयाबीन आणि तुरीला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 27 हजार 831 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जालना बाजारात 9 हजार 836 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक झाली. त्या ठिकाणी तुरीला किमान 5 हजार 100 ते कमाल 7 हजार 750 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजारात आलेल्या काळ्या तुरीला 9 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा उच्चांकी दर मिळाला. बुधवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
कापूस आणि कांद्याच्या दरात घसरण, सोयाबीन आणि तुरीला काय मिळाला भाव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल