हे प्रकरण उघडकीस आल्यापासून धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांपासून अंतर राखलं होतं. आता अखेर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मागच्या अडीचशे दिवसात आपण दोन वेळा मरता मरता वाचलो आहे, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं आहे. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी केलेल्या मीडिया ट्रायलवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांनी नुकतच बीडच्या परळी तालुक्यातील बोधेगाव येथी उद्घाटन सोहळा कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.
advertisement
धनंजय मुंडे नक्की काय म्हणाले?
मनातील खदखद बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, "आपल्याला विधानसभा निवडणुकीतील विजय सुद्धा साजरा करता आला नाही. मी मंत्री पदाची शपथ घेतली. मंत्री म्हणून पदाचा सुद्धा आनंदही घेता आला नाही. जी संकट चालू झाली. ही सगळी निर्मित संकटं आहेत. अचानक आलेली संकटं आहेत. आणि घडवून आणलेली संकटं आहेत. घडून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडायचं काम जरा अवघडच आहे."
"सलग अडीचशे दिवस एकाच घटनेचा ज्यात माझा काही अर्थ संबंध नाही. अशा घटनेवरून इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं मीडिया ट्रायल सुरू होतं. मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो. मला काही बोलायला येत नव्हतं, असा भाग नाही. पण त्या अडीचशे दिवसात मी दोनदा मरता मरता वाचलो. शेवटी आज मी तुमच्यासमोर आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आहे. आता तर नीट झालो आहे. आपल्या सर्वांच्या सेवेत आहे.