नरबळी देण्याच्या प्रकारामुळेच घाबरवण्यासाठी हा प्रकार असल्याची गावकऱ्यात चर्चा रंगली आहे. या प्रकारामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनीही शेतात जायचे केले भीतीपोटी बंद केले आहेत. या संदर्भात पोलीस प्रशासनाला कल्पना देऊनही कोणीच फिरकले नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे . नेमका कशामुळे हा प्रकार तपास करण्याची देखील मागणी गावकरी करत आहेत.
लिंबू कापून त्यामध्ये हळद व कुंकू
advertisement
आजही लिंबू कापून त्यामध्ये हळद व कुंकू टाकून कोपऱ्या कोपऱ्यावर टाकले जातात. याशिवाय नैवेद्यही टाकला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भानामती, करणी-जादूटोणा या सर्व मानवी मनाच्या कल्पना असल्याचे सांगून मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु तरी देखील असे प्रकार समोर आले आहेत.
गावकऱ्यांच्या मनात भीती
पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही असेही प्रकरा घडतात ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. गावचे रस्ते नेहमीच गजबजलेले असतात, पण काळ्या जादूच्या या अघोरी प्रकारामुळे आता हे रस्ते, हे गाव सामसूम झाल्याचं चित्र आहे. गावकऱ्यांवर कुणीतरी करणी करत असल्याची भीती गावकऱ्यांच्या मनात बसली आहे.