जीवन हरिबा चव्हाण आणि हरिबा यशवंत चव्हाण असे आरोपींची नावे आहेत. तर सहदेव पवार आणि प्रियांका पवार अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. तुळजापूर सोलापूर हायवेवरील करजखेडा गावातील भर चौकात हत्येची घटना घडली. घटनास्थळावरून काही मिनिटांत आरोपी फरार झाले.
आरोपी चव्हाण बापलेक आणि मयत सहदेव यांचा जमिनीवरून वाद सुरू होता. त्या वादातून सहदेव यांच्यावर ३०७ चा गुन्हा नोंद करण्यात आला होता. अनेक वर्ष सहदेव जेलमध्ये होते. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने तुरुंगाबाहेर होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आहे.
advertisement
घटना नेमकी काय? संपूर्ण घटनाक्रम
सहदेव पवार आणि आरोपी यांच्यातील जमिनीच्या वादातून यापूर्वीच तणाव निर्माण झाला होता. त्या वादात जीवन चव्हाण यांच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ते अनेक वर्ष तुरुंगात होते. अलीकडेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतरच आरोपींनी त्याच्या वडिलांसोबत बदला घेत हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेनंतर लोकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या हत्याकांडात दोन नव्हे तर पाच आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.
पाळत ठेवली, बाप लेकाने मिळून नवरा बायकोला संपवले
चव्हाण बाप-लेकाने मिळून पवार पती पत्नीची हत्या केली. जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने याआधीही दोन्ही कुटुंबात रक्तरंजित थरार रंगला होता. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या विरोधात सूड भावनेने पेटलेली होती. अखेर सहदेव पवारची जामिनावर सुटका झाल्याचे कळताच भर चौकात चव्हाण बाप लेकाने पाळत ठेवून दोघांवरही वार करून त्यांना संपवले.