आईने स्वतः बॉण्ड पेपरवर संमती देत सोलापूर येथील कांबळे कुटुंबाला मुलाची विक्री केली. मुलगा आणि सून हरवल्याची मुलाच्या आजीने मुरूम पोलिसांत तक्रार केल्यानंतर प्रकरण समोर आले. आजीला सोबत घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी मूल ताब्यात घेत बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले.
मुलाची तब्येत खालावल्याने बाल कल्याण समितीच्या आदेशाने मुलावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मुलाला ताब्यात घेण्यासाठी सोलापूर येथील कांबळे कुटुंब आणि सामाजिक कार्यकर्ते धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत. धाराशिव शासकीय रुग्णालयाच्या आवारातच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होते.
advertisement
मुलाच्या आईने लग्न करून जळगावला पळ काढण्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल आणि पीडित मुलाच्या आजीने केली आहे.
मुलाला ताब्यात घेण्यावरून शासकीय महाविद्यालयामध्ये गोंधळ सुरू होता. प्रकरण बाल कल्याण समितीकडे म्हणजे न्यायालयाकडे गेले असल्याने पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.
