TRENDING:

Video: ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांच्यात बैठकीत वाद, पालकमंत्री सरनाईक संतापले

Last Updated:

Dharashiv DPDC: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यात जुंपली. पालकमंत्री सरनाईक यांनी दोघांच्या वादात मध्यस्थी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. 268 कोटींच्या विकास कामांना स्थगिती मिळाल्याने आणि तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणावरून बैठकीत दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक संघर्ष झाला. हा सगळ वाद पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर घडला.
ओमराजे-राणा पाटील यांच्यात वाद
ओमराजे-राणा पाटील यांच्यात वाद
advertisement

विकास कामांना स्थगिती देणारा आणि सरकारच्या कानात सांगणारा झारीतील शुक्राचार्य नेमका कोण आहे, हे उघड सांगा, असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विचारला. यावर ज्याला ही माहिती हवी आहे, त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जावे. काम वाटपात गैरप्रकाराच्या तक्रारी आल्यामुळेच स्थगिती देण्यात आली आहे, असे आमदार राणा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

advertisement

दोघांचा वाद पाहून पालकमंत्री प्रताप सरनाईक संतापले. स्थगित केलेला निधी रद्द होणार नाही. जर मी पालकमंत्री नकोसा वाटत असेल, तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र द्या, अशा शब्दात दोघांच्या वादावर सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

advertisement

दरम्यान, तुळजापूर ड्रग्स प्रकरणातही वाद चिघळला. या प्रकरणात कोणत्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे, हे उघड करा, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी विचारला. त्यावर बोलताना, माझ्याच सांगण्यावरूनच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. काहीजण या प्रकरणावर राजकारण करत आहेत, त्यांना विचार करण्याची गरज आहे, असे आमदार राणा पाटील म्हणाले.

बैठकीत वाढत चाललेल्या वादामुळे अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केले. जिल्ह्यातील विकास कामांवर राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांच्यात बैठकीत वाद, पालकमंत्री सरनाईक संतापले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल