पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वापरायचा नाही, असे सांगून वाहन अडवून प्रत्येक वाहनाकडून पैसे घेतले जात होते, असा आरोप मारहाण झालेल्या पीडितांनी केला आहे. लोहारा तालुक्यातील धानोरी नंदी पाटील रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.
मारहाण करणारे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींनी पीडितांना गंभीर मारहाण करून त्यांचे डोके फोडले तसेच त्यांच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. हातात दगड आणि काठ्या घेऊन जमावाने मारहाण केली.
advertisement
मारहाण झालेल्यांवर उमरगा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाला सोलापूरला हलविण्यात येणार आहे. लोहारा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री कलम 109, 308, 126, 118, 115, 352, 189, 191, 190, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, घटनेने पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण असून हल्ला करणारे शेतकरी नसून गावगुंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
