TRENDING:

तुळजाभवानी मंदिरात दारू ढोसून पुजाऱ्याचा गोंधळ, कार्यालयाची तोडफोड, दगड मारून दरवाजे फोडले

Last Updated:

Tulja Bhavani Mandir: मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजाऱ्याने तुळजा भवानी मंदिर कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुळजापूर (धाराशिव): तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात दारू पिऊन पुजाऱ्याने गोंधळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. दारू ढोसून पुजाऱ्याने कार्यालयाची तोडफोड केली. त्याने दगड मारून दरवाजेही फोडले.
तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याचा राडा
तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याचा राडा
advertisement

मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजाऱ्याने दारू पिऊन धिंगाणा केला. अनुप कदम असे गोंधळ घालणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात दारूड्या पुजाऱ्याचा गोंधळ

याआधी त्याने मद्यपान करून तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. अनुप कदम याने 13 एप्रिल 2025 रोजी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केल्याचा प्रकार घडलेला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देखील त्याने वाद घातल्याचे प्रकार घडले आहेत.

advertisement

मंदिर बंदी का करण्यात येऊ नये, नोटिस देताच पुजाऱ्याचा गोंधळ

या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मंदिर बंदी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस दिल्याने त्याने गोंधळ घातला. घटनेनंतर मंदिर संस्थानकडून तुळजापूर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुळजाभवानी मंदिरात दारू ढोसून पुजाऱ्याचा गोंधळ, कार्यालयाची तोडफोड, दगड मारून दरवाजे फोडले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल