धनाजी निवृत्ती अंचेवाढ (रा. शेळगाव, ता. परंडा) असे गंभीर जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी अंचेवाढ हे आपल्या चारचाकी वाहनातून शेळगावकडे जात असताना पाठीमागून आलेल्या एका वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्यांची गाडी अडवून काठ्या आणि कुऱ्हाडीने स हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला व पायाला गंभीर फ्रॅक्चर झाला आहे. शरीरावरही गंभीर जखमा झाल्या आहेत.
advertisement
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
हल्ल्यानंतर अंचेवाढ यांना तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत, हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावात वातावरण तापले असताना हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राजकीय तणाव वाढण्याची शक्यता
दरम्यान, हल्लेखोरांचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी जप्त केली असून, तपासादरम्यान त्या गाडीत काठ्या आणि कुऱ्हाडी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबी पोलिस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे परंडा तालुक्यात राजकीय तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शांतता राखण्याचे आवाहन
पोलिसांकडून दोन्ही बाजूंची चौकशी करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे सत्य परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगालाही या घटनेची माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. मतदानाच्या आधी अशा प्रकारच्या घटना घडल्याने निवडणूक प्रक्रियेच्या शांततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. उद्या होणाऱ्या मतदानादरम्यान शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
