TRENDING:

डाळिंबाच्या दरात उलथापालथ, हळदीच्या भावात मोठी उसळी, आल्याची काय स्थिती?

Last Updated:

शुक्रवार, दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: शुक्रवार, दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, हळद आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
advertisement

आल्याच्या आवकेत सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2596 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1751 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल आल्यास 1750 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

Weather Alert : महाराष्ट्रात वारं बदललं, आता येणार उष्णतेच्या लाटेचं संकट, हवामान खात्याकडून अलर्ट

advertisement

View More

हळदीला दराची झळाळी

राज्याच्या मार्केटमध्ये आज 1483 क्विंटल हळदीची आवक झाली. यापैकी 1233 क्विंटल राजापूरी हळदिची सर्वाधिक आवक सांगली मार्केटमध्ये राहिली. त्यास प्रतीनुसार 12300 ते 21300 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 100 क्विंटल हळदीस 18500 ते 23000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

डाळिंबाच्या दरात चढ-उतार 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 1539 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1171 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल डाळिंबास 18000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, हळदीच्या भावात मोठी उसळी, आल्याची काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल