या मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीसह इतर पक्ष तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणुकीत उतरले होते. या तिन्ही तालुक्यात सावंत यांनी पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत आपली सत्ता स्थापन करत गड काबीज केला आहे.
वंचितच्या सदस्याला उपसभापती
परांडा पंचायत समिती येथे अर्चना जाधव तर उपसभापतीपदी परसु गवारे यांची निवड झाली. तर भूम पंचायत समितीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत दहा जागांपैकी शिवसेना पक्षाला पाच, राष्ट्रवादीला तीन, भारतीय जनता पार्टीला एक, वंचित बहुजन आघाडीला एक मिळाली. पक्षीय बलाबल पाहता सत्ता स्थापन करण्यासाठी सहाची आवश्यकता होती. पाच जागा निवडून आलेल्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत वंचितच्या विजयी उमेदवार प्रियंका रणबागुल यांना उपसभापती पद दिले.
advertisement
कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण, फटाके फोडून जल्लोष साजरा
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व पक्ष एकवटल्याने शिवसेना पक्ष आणि तानाजी सावंत यांना मोठा राजकीय संघर्ष करावा लागला होता. आता या तिन्ही पंचायत समितीच्या सभापतीपदी सावंत समर्थकांची निवड झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात शिवसेना आणि तानाजी सावंत यांचे वर्चस्व वाढले आहे. यानिमित्ताने सावंत हे एक नंबरच्या क्रमांकाचे पंचायत समिती ताब्यात असणारे नेते झाले असून या विजयानंतर सावंत आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला.
