TRENDING:

Dharashiv: दोन दिवसांपासून तक्रार घेतली नाही, माय लेकराने पोलिस ठाण्यातच विष घेतले

Last Updated:

पीडित मायलेक गेल्या दोन दिवसांपासून खाजगी सावकारांकडून होणाऱ्या मारहाणीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात चकरा मारत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, धाराशिव : पोलिसांनी तक्रार न घेतल्याच्या रागातून माय-लेकाने थेट पोलीस ठाण्यातच विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात घडली आहे. व्यंकटेश सतिश पडिले आणि संगिता सतिश पडिले अशी या गंभीर जखमी झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
धाराशिव रुग्णालय
धाराशिव रुग्णालय
advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मायलेक गेल्या दोन दिवसांपासून खाजगी सावकारांकडून होणाऱ्या मारहाणीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात चकरा मारत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही. वारंवार उडवा-उडवीची उत्तरे दिल्यामुळे अखेर वैतागलेल्या माय-लेकरांनी पोलिस ठाण्याच्या परिसरातच उंदर मारण्याचे औषध सेवन केले.

या घटनेनंतर पोलिस विभागावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकरणावर अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

advertisement

ही घटना पोलिसांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv: दोन दिवसांपासून तक्रार घेतली नाही, माय लेकराने पोलिस ठाण्यातच विष घेतले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल