घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाचुंदा तलावाच्या परिसरातून कुत्र्याने एक मानवी कवटी तोंडात धरून आणली या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहाणी केली असता तिथे साडी मंगळसूत्र आणि काही कपडे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या वस्तूंच्या आधारे तपास सुरू केला.
advertisement
3 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरातील रहिवासी असलेल्या अनिता इंगळे या घरातून निघून गेल्याची नोंद तुळाजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तू या महिलेच्या घरच्यांना दाखवल्या, या वस्तूच्या आधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली आहे. मात्र तरी देखील मृतदेहाबद्दल अधिक खात्री करण्यासाठी पोलिसांकडून आता डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.