अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. सुरेश बिराजदार यांच्या भावी खासदार उल्लेखानं आता शिवसेना आणि भाजपनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं देखील धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
नुकत्याच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षांतर्गत निवडी जाहीर झाल्या आहेत. त्यात सुरेश बिराजदार यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्यानंतर जिल्हाभरात लावलेल्या पोस्टरवर सुरेश बिराजदार यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरमुळे चर्चेला उधाण आलं असून, या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट देखील इच्छूक आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आता ही जागा कोण लढवणार? शिवसेना, भाजप की अजित पवार गट हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.