बीडचं प्रकरण गाजत असताना धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. कदम यांची गाडी अडवून काही गुडांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, असा दावा निकम यांनी केला होता.
पण निकम यांनी बंदूक परवाना मिळवण्यासाठी हा कट रचला होता. आपल्या काही साथीदारांना हाताशी धरून त्यांनी स्वत:वर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचं उघड झालं आहे, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. सरपंचावरील कथित हल्ल्याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल दाखल केला होता.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांनी बंदूक परवाना मिळवण्यासाठी आपल्या काही साथीदारासोबत स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचला होता. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. एवढंच नव्हे तर आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सरपंच निकम यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. पण त्यांचा हा सगळा स्टंट असल्याचं उघड झालं आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.