अजित पवार आणि राहुल मोटे हे नात्याने काका भाचे आहेत. मात्र राहुल मोटे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना राहुल मोटे यांनी तानाजी सावंत हे टक्केवारीचा व्यवहार करत असल्याचं म्हणत भ्रष्टाचाराचा आरोप केला. या आरोपाला आता तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी उत्तर दिलंय.
advertisement
Chandrayaan 3 : बाप्पा, चांद्रयान 3 मोहिम यशस्वी होऊदे; दगडुशेठ गणपतीला महाअभिषेक
धाराशिव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप चुकीचे व तथ्यहीन असल्याचे सांगत डॉक्टर सावंत यांचा उल्लेख हप्तेखोर मंत्री असे केल्याबद्दल मोठे यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी दिला आहे.
दोन दिवसापूर्वी माजी आमदार राहुल मोटे यांनी परंडा येथे पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सावंत यांच्यावर भ्रष्टाचार व टक्केवारी घेत असल्याचा गंभीर आरोप केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे व धनंजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. राहुल मोटे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले असून लवकरच कायदेशीर नोटीस देणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून सावंत व राहुल मोठे यांच्यात राजकीय शाब्दिक वाद रंगताना पाहत असून आता हा कोर्टाच्या नोटशीपर्यंत जाऊन पोहोचला आहे.