ऑक्सिजन अभावी 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भुम ग्रामीण रुग्णालयातील घटना घडली. 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेचं दुर्लक्ष होत असुन यंत्रणा कोलमडली असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. वेळेवर उपचार व डॉक्टर नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बाळाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. तसंच रुग्णालयात डॉक्टर नव्हते असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. सादीया सद्दाम पठान गाव शेकापुर ता.भुम असे मृत्यू बाळाचे नाव आहे. बाळाच्या मृत्यूमुळे रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2023 1:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv : ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाहीत, ऑक्सिजन अभावी 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू; कुटुंबियांचा आरोप