वीस वर्षांपासून केलीय झाडांची लागवड
धाराशिव शहरातील एकता नगर भागात एक जुनी खदान आहे. याच खदानीचा परीसर 20 वर्षांपूर्वी ओसाड होता. या परिसरात अब्दुल सत्तार पठाण यांनी झाडे लावून आता बगीचा फुलवलाय. पठाण यांनी वाहन चालक म्हणून शासकीय रुग्णालयात सेवा केली. 1996 साली ते सेवेतून निवृत्त झाले. त्यांना सध्या 15 हजार रुपयांचे निवृत्ती वेतन मिळतेय. त्याच पैशातून त्यांनी जांभूळ, गुलमोहर, चिकू, निलगिरी, निम, आंबा, नारळ, बदाम या अशा फळझाडांची लागवड केली आहे. आता बिस्मिल्ला गार्डन सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतंय.
advertisement
शेतकऱ्याची सोयाबीनपासून दूध आणि पनीर निर्मिती; महिन्याला 40 हजार निव्वळ नफा, पाहा Video
खदानीतील पाण्यावर फळझाडांची जोपासना
जवळपास 18 गुंठे नगरपालिकेच्या क्षेत्रावर पठाण यांनी या झाडांची लागवड केली आहे. शेजारीच दगडाच्या खदानीत वाहून आलेले पाणी आहे. याच पाण्यावर ते फळझाडांची जोपासना करतात. फळझाडांची जोपासना करण्यासाठी त्यांना सद्दाम बेगम पठाण, फिरोज पठाण, फैज पठाण व गल्लीतील लोक मदत करतात. तर फळझाडांना लागलेली फळे ही लहान मुलांना वाटप केली जातात, असंही पठाण यांनी सांगितलं.
गावची तहान भागवणारा जलदूत, सिद्धेश्वर यांच्या या निर्णयाला कराल सलाम, Video
घराशेजारी करावी वृक्षलागवड
18 गुंठ्यात पठाण यांनी जवळपास 120 झाडे गेल्या वीस वर्षांपासून लावले आहेत. आपण सर्वांनीच आपल्या अवतीभवती घराशेजारी, शक्य असेल तिथे झाडे लावली पाहिजेत. इतकच नाही तर ती जगवली पाहिजेत, असेही बिस्मिल्ला गार्डनचे निर्माते अब्दुल पठाण सांगतात.