ठाकरेंच्या उमेदवाराच्या अंगावर गरम तेल, मतदानच्या एक दिवस आधीच धक्कादायक प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळंब तालुक्यातील देवळाली गावात प्रचाराच्या सांगता रॅलीदरम्यान शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार मनीषा वाघमारे यांच्या अंगावर गरम तेल पडलं. या घटनेत त्या गंभीररित्या भाजल्या. प्रचारादरम्यान ही घटना घडताच त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, खामसवाडी जिल्हा परिषद गटातून मनीषा वाघमारे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कळंब तालुक्यातील देवळाली गावात त्यांच्या सांगता रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला होता आणि हातात धगधगती 'मशाल' घेऊन रॅली सुरू होती.
या रॅलीदरम्यान अचानक मनीषा वाघमारे यांचा पाय अडकला आणि त्या तोल जाऊन पडल्या. याच वेळी त्यांच्या हातातील पेटत्या मशालीतील गरम तेल त्यांच्या अंगावर सांडले. हे तेल अंगावर उडाल्याने त्यांचे हात आणि पाय गंभीररित्या भाजले.
advertisement
नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
या घटनेनंतर रॅलीत एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांनी तातडीने मनीषा वाघमारे यांना धाराशिव येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्या गंभीररीत्या भाजल्या असल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 2:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरेंच्या उमेदवाराच्या अंगावर गरम तेल, मतदानच्या एक दिवस आधीच धक्कादायक प्रकार









