Ranji Trophy : स्वत: 'क्रिकेट देव' समजवून सांगत होता पण मुंबईच्या खेळाडूंनी काहीच ऐकलं नाही, प्रसिद्ध कृष्णाने केला टांगा पटली!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MUM vs KAR, Sachin Tendulkar : सचिनने प्रेशरमध्ये कसं खेळायचं हे सांगून देखील मुंबईच्या खेळाडूंना बॅक टू बॅक विकेट्स सोडल्या. सलमीवीर यशस्वी जस्वाल चांगली कामगिरी करू शकला नाही.
Mumbai vs Karnataka Ranji Trophy Quarter-Final : रणजी ट्रॉफीमधील मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील सामना हंगामाच्या उपांत्यपूर्व फेरीत 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील एमसीए-बीकेसी मैदानावर खेळवला जात आहे. कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी मुंबईच्या खेळाडूंसोबत दबाव हाताळणं आणि विजयी मानसिकता राखणं याबद्दलचे विचार सचिन तेंडूलकरने बुधवारी शेअर केले होते. पण शुक्रवारी लगेच मुंबईच्या खेळाडूंनी माती खाल्ली.
109 वर 7 विकेट्स
सचिनने प्रेशरमध्ये कसं खेळायचं हे सांगून देखील मुंबईच्या खेळाडूंना बॅक टू बॅक विकेट्स सोडल्या. सलमीवीर यशस्वी जस्वाल चांगली कामगिरी करू शकला नाही तर अखिल हेरवाडकर याने मजबूत पाय रोवून स्कोरबोर्ड चालवला. तर मुशीर खान याला एक धाव करता आली. सिद्देश लाड, सुर्यांश शेंडगे यांच्या फॉर्म्युला चालला नाही. कॅप्टन शार्दुल ठाकूर देखील 16 रन्स करून आऊट झालाय. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी 109 वर 7 विकेट्स अशी परिस्थिती मुंबईची होती. कर्नाटककडून प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट्स नावावर केल्या.
advertisement
काय म्हणाला होता शार्दुल ठाकूर?
ड्रेसिंग रूममध्ये सचिन सर असणं हे आमचं भाग्य आहे. ते केवळ प्रेरणादायी संभाषण नव्हतं, तर प्रश्नोत्तरांचे सत्र होते. सर्व खेळाडू आणि संबंधित प्रशिक्षकांनी त्याला विविध प्रश्न विचारले. हे प्रश्न तयारी, विजयी मानसिकता आणि कठीण परिस्थितीत दबाव हाताळण्यापर्यंत होते, असं शार्दुल ठाकूर म्हणाला होता. मात्र, मुंबईच्या खेळाडूंना प्रेशर हँडल करता आलं नाही.
advertisement
Our very own legend, Sachin Tendulkar, visited the MCA ground at BKC today to interact with and inspire the Mumbai team ahead of the upcoming Ranji Trophy Elite fixtures.
His passion for Mumbai cricket remains as strong as ever as he continues to motivate generations of players,… pic.twitter.com/wpcIDlgZFS
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) February 4, 2026
advertisement
दरम्यान, सचिन सरांचे मार्गदर्शन मुंबई संघासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. खेळातील एका महान खेळाडूकडून शहाणपणाचे काही शब्द ऐकून सर्व मुले आनंदी आहेत, असंही शार्दुल ठाकूर म्हणाला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर, ठाकूर या नॉकआउट सामन्यासाठी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालसह संघात परतला आहे. मात्र, जयस्वालला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाहीये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 2:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : स्वत: 'क्रिकेट देव' समजवून सांगत होता पण मुंबईच्या खेळाडूंनी काहीच ऐकलं नाही, प्रसिद्ध कृष्णाने केला टांगा पटली!










