ना शिट्टी, ना आरोग्याला धोका, आता 100 वर्षे बिनधास्त वापरा, पुणेकरानं बनवलाय मातीचा कुकर, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pottery: हा कुकर विना शिट्टीचा असून पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासून तयार करण्यात आला आहे. तो टिकाऊ असल्याचंही नितीन गिडवानी सांगतात.
पुणे: गेल्या काही वर्षांपासून आपल्या जीवनपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पूर्वी अन्न शिजवण्यासाठी माती, पितळ किंवा लोखंडाच्या भांड्यांचा वापर केला जात होता. मात्र अलीकडे या भांड्यांचा वापर कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर स्टीलच्या भांड्यांचा वापर वाढला आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील निनाद गिडवानी यांनी विना शिट्टीचा मातीचा कुकर विकसित केला आहे. हा कुकर पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासून तयार करण्यात आला आहे. याविषयीची माहिती निनाद गिडवानी यांनी लोकल18 सोबत बोलताना दिली आहे.
निनाद गिडवानी यांनी सांगितलं की, त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर अनेक गोष्टींवर संशोधन करण्याचा प्रवास सुरू झाला. त्यांनी आत्तापर्यंत विविध क्षेत्रांत संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांना भारत सरकारकडून अनेक पुरस्कार आणि गोल्ड मेडल मिळाले आहेत. त्यांनी तयार केलेल्या विनाशिट्टीच्या मातीच्या कुकरला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून सुवर्णपदक मिळाले आहे. या कुकरमध्ये अन्न शिजवल्यास त्यातील सर्व पोषक घटक टिकून राहतात आणि आपल्याला त्या पदार्थातील सर्व पोषक तत्व मिळतात, असं त्यांनी सांगितलं. ही भांडी https://www.ninadspottery.com/ या वेबसाईटवरून घेता येतात.
advertisement
पाच प्रकारच्या मातीचा वापर करून कुकर
नॅचरल प्रेशर कुकर हा पारंपरिक प्रेशर कुकरला चांगला पर्याय असल्याचं निनाद यांनी सांगितलं. पारंपरिक कुकरमध्ये अन्न खूप जास्त दाबाखाली शिजते. कधी शिट्टी नीट न झाल्यास कुकर फुटण्याचा धोका असतो. तसेच अन्नातील चव व पोषणमूल्ये कमी होतात. मात्र, नॅचरल प्रेशर कुकर जो मातीपासून बनवला आहे. यामध्ये फक्त आवश्यक तेवढाच दाब तयार होतो, असे निनाद सांगतात.
advertisement
झाकणाच्या खास कोनाकार रचनेमुळे कुकरमधील जास्तीची वाफ आपोआप बाहेर जाते. त्यामुळे कुकरमध्ये जास्त दाब साचत नाही आणि अन्न सुरक्षितपणे शिजते. अन्नाची चव, सुगंध आणि पोषणमूल्ये टिकून राहतात. विशेष म्हणजे 100 वर्ष या कुकरला गॅसवर वापरल्यास कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही. यामध्ये 5 प्रकारच्या मातीचा वापर केला आहे. यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम याचा देखील लेप देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
काय फायदे आहेत?
मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्यास अन्न अधिक चवदार, पौष्टिक आणि आरोग्यदायी होते. या भांड्यांमुळे अन्नातील नैसर्गिक चव आणि पोषणमूल्य टिकून राहत तसेच कोणतीही रासायनिक भेसळ होत नसल्याने अन्न पूर्णपणे सुरक्षित राहते. धातूच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक आरोग्यास हानिकारक आहे. अन्नात हानिकारक घटक मिसळतात, चव कमी होते, पोषणमूल्य कमी होते आणि गॅस जास्त लागतो. त्यामुळे मातीच्या भांड्यांचा वापर करणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं निनाद यांनी सांगितलं.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 2:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ना शिट्टी, ना आरोग्याला धोका, आता 100 वर्षे बिनधास्त वापरा, पुणेकरानं बनवलाय मातीचा कुकर, Video








