advertisement

Amravati Mayor Election: अमरावतीत महापौर निवडणुकीत उलटफेर! एमआयएमचा भाजपला पाठिंबा, महायुती विजयी

Last Updated:

Amravati Mayor Election : अमरावती महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला.

अमरावतीमध्ये मोठा ट्विस्ट, महापौर पदासाठी एमआयएमचा भाजपला पाठिंबा
अमरावतीमध्ये मोठा ट्विस्ट, महापौर पदासाठी एमआयएमचा भाजपला पाठिंबा
अमरावती: अमरावती महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत एमआयएमच्या (MIM) महिला नगरसेविकेने भाजपला पाठिंबा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजकीय समीकरणे आणि एमआयएमचा 'ट्विस्ट'

८७ सदस्यीय अमरावती महानगरपालिकेत बहुमतासाठी लागणारा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. महायुतीमध्ये भाजप, नवनीत राणांचा युवा स्वाभिमान पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आधीच एकत्र होते. मात्र, ऐनवेळी बडनेरा येथील एमआयएमच्या महिला नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आणि श्रीचंद तेजवानी यांचा मार्ग मोकळा झाला. अमरावती महानगरपालिकेत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर पदी तर उपमहापौर पदी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमांनचे सचिन भेंडे विजयी झाले आहेत.
advertisement

विरोधक गारद

महाविकास आघाडीने या निवडणुकीत महायुतीला रोखण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. मात्र, महायुतीच्या एकजुटीसमोर आणि एमआयएमच्या एका नगरसेविकेच्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले. एका नगरसेविकेने भाजपला पाठिंबा दिला. तर, एमआयएमच्या उर्वरित नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. श्रीचंद तेजवानी यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात मोठा जल्लोष केला आहे.

> अमरावती महापालिका संख्याबळ

advertisement
>> एकूण जागा - ८७
> भाजपा - २५
> राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १६
> एमआयएम - १५
> काँग्रेस - १४
> युवा स्वाभिमानी पक्ष - १०
> शिवसेना - ३
> शिवसेना (उबाठा) - १
> इतर - ३
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati Mayor Election: अमरावतीत महापौर निवडणुकीत उलटफेर! एमआयएमचा भाजपला पाठिंबा, महायुती विजयी
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement