advertisement

बॉर्डर, मर्दानी, धुरंधरच्या युद्धात मराठी शाळेने मारली बाजी'! आता 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम 2', कधी येणार सीक्वेल?

Last Updated:
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2 : एकिकडे धुरंधर, बॉर्डर 2 आणि मर्दानी 3 या हिंदी फिल्ममध्ये चढाओढ सुरू आहे. तर दुसरीकडे मराठी फिल्मने चांगलीच बाजी मारली आहे. क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम या फिल्म्सच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली आहे.
1/5
मराठी माध्यमाच्या शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार करत आपलं यश अधिक भक्कम केलं आहे. 
मराठी माध्यमाच्या शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार करत आपलं यश अधिक भक्कम केलं आहे.
advertisement
2/5
शिक्षक-विद्यार्थी नात्याची भावनिक मांडणी, वास्तवाशी जोडलेला आशय आणि मराठी शाळेच्या आठवणी जागवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट केवळ यशस्वी ठरला नाही, तर प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरला.
शिक्षक-विद्यार्थी नात्याची भावनिक मांडणी, वास्तवाशी जोडलेला आशय आणि मराठी शाळेच्या आठवणी जागवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट केवळ यशस्वी ठरला नाही, तर प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरला.
advertisement
3/5
या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं आहे. तर निर्मिती क्षिती जोग यांची आहे. विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ हे सहनिर्माते आहेत.

4/5
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, 'हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 25 कोटींचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाही. याच प्रेमामुळे आम्हाला अधिक प्रामाणिक, आशयघन चित्रपट घेऊन येण्याची ऊर्जा मिळते
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, 'हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 25 कोटींचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाही. याच प्रेमामुळे आम्हाला अधिक प्रामाणिक, आशयघन चित्रपट घेऊन येण्याची ऊर्जा मिळते"
advertisement
5/5
या फिल्मच्या यशानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. याच सोहळ्यात प्रेक्षकांसाठी सरप्राईज घोषणा करण्यात आली. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' फिल्मचा आता दुसरा भागही येणार आहे, 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम 2' फिल्मची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पण फिल्म कधी येणार याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही.

BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement