advertisement

अपघातात शिवसैनिक अकाली गेला, बापाचं छत्र हरवलेल्या मुलांना आमदारांनी दत्तक घेतले

Last Updated:

सध्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू असून यासाठी नेत्यांचे प्रचार दौरे सुरू होते.

तानाजी सावंत
तानाजी सावंत
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : भूम तालुक्यातील देवळाली गावात अपघातात मयत झालेल्या महेंद्र बोराडे या शिवसैनिकाची दोन मुले आमदार तानाजी सावंत यांनी दत्तक घेतली. जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेदरम्यान भेटायला आलेल्या मुलांची व्यथा ऐकून माजी मंत्री तानाजी सावंतांनी गावकऱ्यासमोरच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे धाराशिवमध्ये स्वागत होत आहे.
अपघातात मयत झालेल्या महेंद्र बोराडे या शिवसैनिकांची दोन मुलं आमदार तानाजी सावंत यांनी दत्तक घेतले असून त्या मुलांच्या शिक्षणाची व लग्नाचा अक्षदा पडेपर्यंत जबाबदारी घेत असल्याचेही तानाजी सावंत यांनी जाहीर केले.

शिवसैनिक महेंद्र बोराडे यांचे अपघाती निधन

गावात प्रचार सभेदरम्यान तानाजी सावंत आले असता पुढे बसलेल्या शिवसैनिकांनी महेंद्र बोराडे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीविषयी सावंत यांना सांगितले. त्यावर त्यांनी मुलांना तत्काळ मंचावर बोलावून दत्तक घेत असल्याचे गावकऱ्यांसमोर जाहीर केले.
advertisement

गावकऱ्यांनी शिवसैनिकाच्या कुटुंबाची व्यथा सावंतांना बोलून दाखवली अन्...

सध्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू असून यासाठी नेत्यांचे प्रचार दौरे सुरू होते. शुक्रवारी देवळाली गावात तानाजी सावंत यांची प्रचार सभा होती. गावातीलच महेंद्र बोराडे यांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले. त्यांचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांचा मुलगा आणि मुलीचा शिक्षणाचा प्रश्न होता. त्यांच्या कुटुंबाची व्यथा शिवसैनिकांनी सावंत यांच्यासमोर बोलून दाखवली.
advertisement

तानाजी सावंत यांचा संवेदनशील निर्णय, गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले

त्यावर जोपर्यंत मुला-मुलींच्या डोक्यावर अक्षता पडत नाही तोवर मी त्यांचे पालणपोषण करेन, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलेन, असा शब्द सावंत यांनी गावकऱ्यांना दिला. अतिशय भावनिक करणाऱ्या प्रसंगाने गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अपघातात शिवसैनिक अकाली गेला, बापाचं छत्र हरवलेल्या मुलांना आमदारांनी दत्तक घेतले
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement