नाद करतो काय...
काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलीच्या वाढदिवसाला ‘फॉच्युनर’ एसयुव्ही भेट दिल्यानंतर हे हॉटेल राज्यभरात चर्चेत आले होते. आता मात्र, “नाद करतो काय...” म्हणत वाद विकोपाला गेल्याचे व्हिडिओत दिसून आलं होतं. अशातच आता हॉटेल भाग्यश्रीमध्ये राडा झाल्याने मोठा वाद पेटला आहे. हॉटेल भाग्यश्रीच्या कर्मचाऱ्यांवर कुणी हल्ला केला? असा सवाल देखील विचारला जात आहे.
advertisement
पुण्याहून बॉऊन्सर आणले
या घटनेने पुन्हा एकदा भाग्यश्री हॉटेल चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, पोलिसांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. मालकाने फॉर्च्युनर घेतल्याने सर्वांच्या नजरा या हॉटेलवर होत्या. अशातच मार्केटिंगच्या भन्नाट स्टाईलमध्ये पुढं आलेलं हे हॉटेल आता वादाच्या केंद्रस्थानी आलं आहे. अशातच आता काही तरुणांच्या दादागिरीविरुद्ध मालकाने थेट पुण्याहून बॉऊंसर आणले आहेत.
काही दिवसांपूर्वी दगडफेक
सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यावरून तीन बाऊन्सर आणल्याचं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने सांगितलंय. काही दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक झाली होती. हॉटेल बंद असताना समाजकंटकांनी मोठं नुकसान केल्याने हॉटेल भाग्यश्रीचे मालक भडकले होते.
मटण थाळी अन् अनलिमिटेड रस्सा
दरम्यान, 250 रुपयांमध्ये मटण थाळी अन् अनलिमिटेड रस्सा आणि झणझणीत चव असलेल्या हॉटेल भाग्यश्रीने धाराशिवमध्ये धुरळा उडवला. भाग्यश्री हॉटेलवर जेवण्यासाठी रांगाच्या रांगा लागतात. दिवसभरात 10 ते 12 बोकड कापले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळे हॉटेलवर चांगली गर्दी जमत आहे. पण आता हॉटेलवरून वाद पेटत असल्याने सोशल मीडियावर निगेटिव चर्चा देखील होताना दिसत आहे.