आरोपींनी चाकू, हंटर आणि हातातील कड्याने एकमेकांना मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या हाणामारीत एका तरुणाचा कान फाटला आहे. तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मुरुम पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उमरगा तालुक्यातील येगेनूर गावात घडली आहे. इथे काही तरुण वेगानं गाडी चालवत होते. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना गाडी सावकाश चालवा, असं म्हटलं. यावरून दोन गटात बाचाबाची झाली. पण पुढच्याच क्षणात हा वाद विकोपाला गेला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं. तरुणांनी चाकू, हंटर आणि हातातील कड्याने एकमेकांना मारहाण केली आहे.
या मारहाणीत एका तरुणाचा तरुणाचा कान फाटला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दोन गटातील तुफान हाणामारीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुरूम पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.