आप्पा काळे, सुनील काळे आणि परमेश्वर काळे असं मयत झालेल्या तिघांची नावं आहेत. सुनील काळे आणि परमेश्वर काळे हे बापलेक आहेत. या हाणामारीत तीन पुरुषांसह एक महिला गंभीर जखमी आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी गावात घडली आहे. इथे रविवारी मध्यरात्री पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी झाली. हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. मागील काही दिवसांपासून या कुटुंबातील चुलत भावांमध्ये शेतात पाणी देण्यावरून वाद सुरू होता. रविवारी हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका गटातील दोन तर दुसऱ्या गटातील एकजणाचा समावेश आहे. मृत सुनील काळे आणि परमेश्वर काळे हे बापलेक होते.
advertisement
या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश क्षिरसागर यांनी दिली आहे.