अजित पवारांना सेना भाजप युतीचे काम आवडले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम आवडले. आम्ही घेत असलेले निर्णय सर्वसामान्यांची काम हे पाहून अजित पवार यांच्यासारखा राष्ट्रवादीचा कणखर नेता आमच्या दिंडीत किंवा आम्ही राबवत असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाला. ही आनंदाची गोष्ट गोष्ट आहे आणि आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे येईल त्याचं स्वागतच करणारे आहोत. त्यामुळेच अजित पवार आमच्यात आले. सहभागी होऊन सत्ता चालवत आहे अशा शब्दात अजित पवार यांचे तानाजी सावंत यांनी कौतुक केले आहे.
advertisement
Mumbai News : वांद्रे मॉब लिंचिंग प्रकरण, जय श्री राम घोषणा देत तरुणाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
बारामतीचं पॅकेज या ठिकाणी आलं होतं. बालिशपणा संपवा, आपण कोणाविषयी बोलतो आणि काय बोलतो हेसुद्धा माहिती नाही. आपलं वय किती, आपण बोलतो किती? आपण त्या घरात जन्माला आलो म्हणून सर्वसामान्यावर बोलायचा अधिकार परमेश्वराने दिलाय का? पुढच्यावेळी असं बोलायचा प्रयत्न केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्ही जनतेसाठी काम करतोय तर मग तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. तुमच्या पक्षाचा कणखर नेता उपमुख्यमंत्री म्हणून आमच्याच पक्षात आला. आम्ही नेता फोडला नाही, ज्यांना जे भावतंय ते येतायत. आम्ही या या म्हणून मागे लागलो नाही. आमचं काम भावलं. लोकांप्रती आमची तळमळ भावली म्हणून अजित दादा आमच्यासोबत आले. हे कौतुक करायचं सोडून आपण कोणत्या दिशेने चाललोय असंही तानाजी सावंत म्हणाले.
रोहित पवार यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर सावंत यांच्यावर टीका केली होती त्यालाही सावंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, हापकिन मंत्री म्हणले याचं मला कौतुक आहे. मला हापकिन मंत्री म्हणण्याआधी हापकिन कोण होता हे सर्च करावं लोकांनी गुगलवर. त्याचं कामही बघावं. त्याचपद्धतीने तानाजी सावंत कोण आहे तेही बघावं. हापकिन रिसर्चर आणि डॉक्टर तानाजी सावंत यांच्यामध्ये आपण कुठे आहे, आपलं अस्तित्व बघणं अपेक्षित आहे.