TRENDING:

आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये होतो फायदा, NCC कॅडेट असणं करिअरच्या दृष्टीने किती महत्त्वाचं?, VIDEO

Last Updated:

ncc cadet benefits - एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स ही संघटना शाळा आणि महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची भावना शिकवते तसेच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते. एकता और अनुशासन हे एनसीसीचे ब्रीदवाक्य आहे. लाखो तरुण आणि विद्यार्थी या एनसीसीचा भाग आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव - नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजे एनसीसी प्रमाणपत्र धारकांसाठी भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलात स्वतंत्रपणे जागा आरक्षित असतात. यामुळे तरुणांना थेट प्रवेश मिळू शकतो. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे एनसीसी प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी एनसीसी कॅडेटसना प्रशिक्षण देण्यात आले. एनसीसी कॅडेट असणे किती महत्त्वाचे आहे. याचबाबत आपण जाणून घेऊयात.

advertisement

एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स ही संघटना शाळा आणि महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची भावना शिकवते तसेच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते. एकता और अनुशासन हे एनसीसीचे ब्रीदवाक्य आहे. लाखो तरुण आणि विद्यार्थी या एनसीसीचा भाग आहेत.

लष्करांशी संबंधित सर्व शिक्षण एनसीसीमध्ये दिले जाते. तरुणांना तिन्ही दलांचे स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाते. तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयाचे नियमित विद्यार्थी असाल तर तुम्ही स्वइच्छेने एनसीसीमध्ये सहज सामील होऊ शकता. यामुळे तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतील.

advertisement

कांद्यावर करपा, फुलकिडीचा धोका, शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, कृषी विभागाने सांगितला महत्त्वाचा सल्ला

एनसीसी जॉईन करण्यासाठी वयोमर्यादा 13 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 26 वर्षे आहे. त्यासाठी आधी तुमची एक छोटी शारीरिक चाचणी होते आणि त्यासाठी तुम्हाला एक फॉर्मदेखील भरावा लागतो. यामध्ये तुमच्या पालकांची स्वाक्षरी अनिवार्य असते.

एनसीसी प्रशिक्षणाचा कालावधी शाळेसाठी 2 वर्ष व कॉलेजसाठी 3 वर्षांचा असतो. शाळेत 2 वर्षे पूर्ण केल्यानंतर A प्रमाणपत्र मिळते. महाविद्यालयाचे एनसीसी 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर B, C प्रमाणपत्र भेटते. एनसीसीच्या प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण मिळते. हे प्रशिक्षण तरुण विद्यार्थ्यांमध्ये तिन्ही दलांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी आयोजित केले जाते. एनसीसी ही देश सेवेसाठी उत्तम काम करणारी ही संस्था आहे. तसेच करिअरच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये होतो फायदा, NCC कॅडेट असणं करिअरच्या दृष्टीने किती महत्त्वाचं?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल