महादेव जानकर यांच्या आधी संभाजीराजे छत्रपती यांनाही देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याचा प्रकार घडला होता. तुळजाभवानी मंदिरात असलेल्या सुरक्षा यंत्रणेवर महादेव जानकर यांनी संताप व्यक्त केला. तसंच गाभाऱ्यात जाण्यापासून अडवल्यानंतर त्यांनी आत न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं आणि बाहेर आले.
मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून अडवल्याच्या प्रकारानंतर महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रशासनाने जनतेचे सेवक कोण आहेत हे तपासावे असं म्हटलं. आम्ही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यात, देशात फिरतो. घडलेल्या प्रकरणा संबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. योग्य पद्धतीने मान सन्मान राखायला हवा. सत्ता येते आणि जाते हे त्यांनी लक्षात ठेवावं असंही जानकर म्हणाले.
advertisement
तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा यंत्रणेचा ठेका घेतलेल्या कंपनीचे मालक माझ्याच गावचे आहेत. त्यांचीही मी चर्चा करणार आहे. संभाजीराजे असोत किंवा आम्ही... आम्ही काय सर्वसामान्य आहे का? असा प्रश्नही जानकरांनी विचारला.
जानकर तुळजाभवानी मंदिरात गेले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. त्यावेळी मी कोण आहे तुला माहित आहे का ? जानकर यांनी विचारताच सुरक्षा रक्षकांनी अरेरावीची भाषा केली. गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेवून महादेव जानकर बाहेर आले. दरम्यान, रासप पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेची तुळजाभवानी देवीच्या आरतीने सुरुवात करण्यात आली.