घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिवच्या वाशीमध्ये वीज ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी महावितरणकडून अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमात आक्रमक झालेल्या काही जणांनी सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ करत मारहाण केली. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर अभियंत्याच्या डोक्यात खुर्ची देखील घालण्यात आली. या मरहाणीत हिंगमिरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
वीज कर्मचाऱ्यांचा संताप
advertisement
वाशी तालुक्यातील सारोळा वाशी येथील लिंक लाईनच्या कामाची मागणी अनेक महिन्यांपासून सुरू आहे, मात्र हे काम होत नसल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अभियंत्यास मारहाण झाल्यानं महावितरणचे कर्मचारी चांगलेच संतप्त झाले असून, त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
advertisement
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
September 09, 2023 8:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धक्कादायक! भर अदालतीमध्ये महावितरण अभियंत्याच्या डोक्यात खुर्ची घातली; धाराशिवमधील प्रकारानं खळबळ