दरम्यान जरांगे पाटील यांच्या या आवाहानाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री यांना गावबंदी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 32 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावांच्या वेशीवर तसा फलक देखील लावण्यात आला आहे. एवढंच नाही तर जरांगे पाटील यांच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन गावागावात मराठा समाजाकडून बैठकांचं देखील आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील आणखी काही गावे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी करण्याची शक्यता आहे.
advertisement
जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला कालावधी उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर 22 ऑक्टोबरला जरांगे पाटील यांनी मराठी बांधवांशी संवाद साधला होता. यावेळी जर पुढील दोन दिवसांत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा एकदा अमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. येत्या 25 ऑक्टोबरला पुढील भूमिका स्पष्ट करू असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 25 ऑक्टोबरला जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.