सुनील माणिकराव गव्हाणे (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही संतापजनक घटना २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग बसस्थानकात घडली. फिर्यादी हे बसची वाट पाहत असताना, तिथेच बसलेला आरोपी कासीम अब्दुल रहीम इनामदार (रा. रहीमनगर, नळदुर्ग) याने सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या महिला, मुली आणि इतर नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ सुरू केला.
advertisement
एवढ्यावरच न थांबता, तो सर्वांसमोर अश्लील हावभाव करू लागला. त्याचा हा विकृत प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेल्या शाळकरी मुली आणि महिला प्रचंड घाबरल्या आणि लज्जेने मान खाली घालून तिथून उठून दूर गेल्या. मात्र, या गोष्टीचा काहीही परिणाम न होता, लोकांची नीतीभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने या मौलवीने आपले अश्लील चाळे सुरूच ठेवले.
हा प्रकार असह्य झाल्याने काही नागरिक पुढे आले आणि त्यांनी आरोपीला जाब विचारला. यावेळी विशाल डुकरे नावाच्या एका नागरिकाने आरोपीचा हा सर्व किळसवाणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
या गंभीर घटनेप्रकरणी ५ ऑगस्ट २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी कासीम इनामदार विरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २९४(१), २९४(२)(अ) आणि २९६ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल उमाजी पांडुरंग गायकवाड करत आहेत. पवित्र पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
