धाराशिव : आजपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी बसच्या चाकांना ब्रेक लागला आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची हाक कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. धाराशिव जिल्ह्यातही याचा परिणाम पाहायला मिळाला.
वेतनवाढीचा करार प्रलंबित असल्याने एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. एसटीची चाके थांबल्याने आता प्रवाशांची गैरसोय होत आहे. मागील 8 वर्षांपासून वेतन वाढीच्या करारासह विविध मागण्यासाठी पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. राज्यभर केल्या जात असलेल्या या आंदोलनात धाराशिव येथील एसटी कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
advertisement
धाराशिव जिल्ह्याचा विचार केला असता यामध्ये धाराशिव, कळंब, भूम ,उमरगा यासह जिल्हाभरातली बस सेवा बंद झाली आहे. त्यामुळे प्रवासी, नागरिक, शाळकरी विद्यार्थी, त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बंद सुरू केला आहे. त्यामुळे बस स्टँडमध्ये प्रवासासाठी आलेले अनेक नागरिक एसटी बसची वाट पाहत आहेत.
साताऱ्यातील कारागृहातील कैद्यांकरिता किर्तनाचा कार्यक्रम, उपक्रमाची महाराष्ट्रात होतेय चर्चा, VIDEO
संपूर्ण जिल्ह्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप कधी मिटणार, एसटी बससेवा कधी सुरळीत होणार, याची वाट नागरिक पाहत आहेत.