Rain in Maharashtra : राज्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात नेमकी कशी राहणार परिस्थिती, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवनावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. उद्या 3 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती नेमकी कशी राहील, हेच आपण आज जाणून घेऊयात.
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : 1 सप्टेंबर पासून विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, जालना या जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवनावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. उद्या 3 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती नेमकी कशी राहील, हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून मधून मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील कमाल तापमान 30°c तर किमान तापमान 27 च्या आसपास असेल. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वतवली आहे.
advertisement
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही अति मुसळधार पावसाचा इशारा तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
साताऱ्यातील कारागृहातील कैद्यांकरिता किर्तनाचा कार्यक्रम, उपक्रमाची महाराष्ट्रात होतेय चर्चा, VIDEO
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास पावसाचा जोर हा कायम राहणार असून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
विदर्भातील यवतमाळ आणि अकोला या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भामधील जिल्ह्यांमध्येही पुढील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2024 7:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Rain in Maharashtra : राज्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात नेमकी कशी राहणार परिस्थिती, VIDEO