इथं अर्ज भरण्याच्या एक तास आधी भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला आहे. इथं भाजपचे बंडखोर उमेदवार आणि त्यांच्या पत्नीवर भाजपच्या उमेदवाराने अचानक हल्ला केला आहे. देवानंद बिलारी असं हल्ला झालेल्या उमेदवाराचं नाव आहे. त्यांच्यावर शिरसाट नावाच्या एका उमेदवाराने हल्ला केल्याचा दावा देवानंद बिलारी यांच्या पत्नीने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलारी दाम्पत्य अर्ज मागे घेण्याच्या एक तास आधी नाशिकातील सिडको विभागीय कार्यालयात आलं होतं. यावेळी देवानंद बिलारी आणि त्यांच्या पत्नी दोघंही आपले कार्यकर्ते आणि समर्थकांसोबत जात होते. याचवेळी भाजपच्या एका उमेदवाराने पाठिमागून अचानक बिलारी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर विभागीय कार्यालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.
advertisement
ही घटना घडताच अवघ्या काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून लोकांना बाहेर काढलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक तास बाकी असताना भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये हा हाय होल्टेज ड्रामा घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तूर्तास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून गर्दी पांगवली आहे.
