जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 हा काळ मिथुन राशीसाठी परिवर्तनाचा आणि प्रगल्भतेचा ठरणार आहे. या दशकात विचारांची दिशा अधिक स्पष्ट होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन संधींचे दरवाजे उघडतील. विशेषतः संवाद, मीडिया, शिक्षण, तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ यशदायक ठरेल. नवीन ओळखी, संपर्क क्षेत्र वाढणे आणि कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळणे यामुळे करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील.
advertisement
नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढतील. कामाचे कौतुक होईल, मात्र सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम, संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल. ऑक्टोबरनंतर प्रमोशन, पदोन्नती किंवा व्यवसायवृद्धीचे संकेत दिसतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी आणि विस्ताराचे योग आहेत. आर्थिक बाबतीत या दशकाच्या पहिल्या सहा महिन्यांत खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर उत्पन्नात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल. योग्य आर्थिक नियोजन केल्यास दीर्घकालीन स्थैर्य मिळू शकते.
प्रेम आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने हा काळ मिश्र अनुभव देणारा आहे. आधीपासून असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. अविवाहितांना विशेषतः सप्टेंबर महिन्याच्या आसपास नवीन प्रेमअनुभव येऊ शकतात. मात्र भावनांपेक्षा विवेकाने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक संवाद वाढवल्यास गैरसमज कमी होतील. भावंडांकडून आधार मिळेल, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल.
आरोग्याच्या दृष्टीने मानसिक थकवा, तणाव किंवा लहान अपघातांकडे दुर्लक्ष करू नये. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे शिक्षण, प्रवास आणि ज्ञानवृद्धीचे योग आहेत. शनी शिस्त आणि संयम शिकवेल, जो दीर्घकालीन फायद्यास कारणीभूत ठरेल. राहू-केतू वेगवान बदल घडवतील, त्यामुळे योग्य दिशा निवडणे आवश्यक आहे.
उपाय म्हणून ॐ बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी दान करणे शुभ ठरेल. हिरवा रंग मिथुन राशीसाठी लाभदायक मानला जातो. एकूणच, 2026 ते 2026 हा काळ मिथुन राशीसाठी आत्मविकास, यश आणि नव्या शक्यतांचा ठरणार आहे, अशी माहिती गुरुजी पंच भाई यांनी दिली आहे.





