Taurus Horoscope 2026: कष्टाचं चीज होणार, प्रेम, पैसा, प्रतिष्ठा मिळणार, पण वृषभ राशीवाले यंदा ‘ती’ चूक नकोच!

Last Updated:

Vrishabha Rashi 2026: वृषभ राशीसाठी यंदाचं वर्ष खास असणार आहे. गुरुच्या प्रभावामुळे शिक्षण आणि करिअरमध्ये उन्नती होईल. तर राहु-केतूच्या प्रभावामुळे...

+
Taurus

Taurus Horoscope 2026: कष्टाचं चीज होणार, प्रेम, पैसा, प्रतिष्ठा मिळणार, पण वृषभ राशीवाले यंदा ‘ती’ चूक नकोच!

पुणे : वृषभ रास (Taurus) ही राशीचक्रातील दुसरी रास असून, तिचे चिन्ह बैल आहे. मेहनत, संयम, शांत पण काहीशी हट्टी वृत्ती हे या राशीचे प्रमुख गुण मानले जातात. पृथ्वी तत्त्वाची आणि स्थिर स्वभावाची ही रास शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये सौंदर्य, कला, ऐशाराम, भौतिक सुखसुविधा आणि व्यवहारकुशलतेची विशेष आवड दिसून येते. हे लोक व्यावहारिक, विश्वासार्ह, कष्टाळू आणि दृढनिश्चयी असतात. मात्र, लवकर राग आल्यास त्यांचे उग्र रूपही समोर येऊ शकते.
करिअरमध्ये संधी
गुरुजी शुभम पंचभाई यांच्या मते, वृषभ राशीसाठी जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 हे वर्ष स्थैर्य, आत्मविश्वास आणि प्रगतीचे ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांकडून मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. विशेषतः जुलै ते डिसेंबर या कालावधीत केलेल्या कष्टांचे चीज होऊन यश प्राप्त होईल.
advertisement
व्यवसायात यश
व्यवसाय क्षेत्रात नवीन भागीदारी, करार तसेच विस्ताराचे संकेत आहेत. कला, बँकिंग, शेती, अन्नपदार्थ, फॅशन, डिझाईन आणि सौंदर्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यात उत्तम धनलाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो, तसेच घर किंवा मालमत्ता खरेदीचे योगही संभवतात. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल.
advertisement
प्रेम आणि विवाह
प्रेम आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमात अनपेक्षित सुखद धक्के मिळू शकतात. अविवाहितांसाठी विवाह जुळण्याचे योग असून, विवाहितांच्या आयुष्यात सौहार्द आणि समजूतदारपणा वाढेल. घरात धार्मिक विधी, पूजा, समारंभ किंवा मंगलकार्य होण्याची दाट शक्यता आहे.
आरोग्यासाठी वर्ष कसं?
आरोग्याच्या बाबतीत वर्ष साधारण असेल. मात्र थायरॉईड, पचनसंस्था, मानदुखी किंवा संधिवात यांसारख्या तक्रारी डोके वर काढू शकतात. त्यामुळे योग, प्राणायाम आणि सात्विक आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
यशप्राप्तीसाठी उपाय
गुरुच्या प्रभावामुळे शिक्षण आणि करिअरमध्ये उन्नती होईल. राहु-केतूच्या प्रभावामुळे काही काळ अस्थिरता जाणवू शकते, पण संयम आणि योग्य निर्णय घेतल्यास परिस्थिती अनुकूल होईल. उपाय म्हणून शुक्रवारी देवीला सुगंधी पुष्प अर्पण करणे, ॐ शुक्राय नमः या मंत्राचा दर शुक्रवारी 108 वेळा जप करणे तसेच स्वच्छ वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल. पांढरा, गुलाबी आणि हलका निळा हे शुभ रंग मानले गेले आहेत.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Taurus Horoscope 2026: कष्टाचं चीज होणार, प्रेम, पैसा, प्रतिष्ठा मिळणार, पण वृषभ राशीवाले यंदा ‘ती’ चूक नकोच!
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement