रोहित पवारांनी बनावट आधारकार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं होतं. त्यानुसार बनावट आधार कार्ड तयार करुन कशा पद्धतीनं पुरावे उभे केले जातात आणि मिटवलेही जातात हे सांगितलं होतं. हे प्रकरण त्यांना अडचणीत आणणार आहेत. डोनाल्ड ट्रम्पयांचं बोगस आधार कार्ड बनवणं भोवणार आहे. धनंजय वागस्करांच्या तक्रारीनंतर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
रोहित पवार काय म्हणाले होते?
बोगस मतदार नोंदण्यासाठी बनावट आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचा पत्रकार परिषदेत मी डेमो दाखवला. याची गृहविभागाने चौकशी केली आणि आधारकार्ड बनावट असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचं समजलं.... आता यावर हसावं की रडावं हेच कळेना... जर मीच स्वतः डेमो देऊन आधारकार्ड बनावट असल्याचं सांगत असेल तर आधारकार्ड खरं की बनावट याची १५ दिवस चौकशी करण्याची मुळातच गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे कसा आहे? असेलच तर डॉ. संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरण यासह अशा कितीतरी घटना आहेत ज्यामधील SIT चौकशी किंवा पोलीस तपास पुढे सरकत नाही. अशा प्रकरणात गृह विभागाने चौकशी करण्यासाठी आपला वेळ खर्च करावा. आपण अभ्यासू नेते आहात आणि त्याचा कायमच आदर आहे, पण आज आपल्या सल्लागारांना समज देण्याची आणि गृहविभागाने रिकामटेकडेपणा सोडून कामावर लक्ष देण्याच्या सूचना देण्याची गरज आहे.
