उत्तम मोहिते असं हत्या झालेल्या राजकीय नेत्याचं नाव आहे. ते दलित महासंघाचे नेते होते. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता. याच वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची मुळशी पटर्न चित्रपटाप्रमाणे हत्या करण्यात आली आहे. यातील हल्लेखोरावर मोहिते समर्थकानी प्रती हल्ला केला होता, यात श्याऱ्या उर्फ श्याब्या शेख गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी शाब्या शहारूख शेख याला मृत घोषित केलं आहे.
advertisement
गारपीर परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हल्ल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम मोहितेवर शाब्या शाहरुख शेख यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर उत्तमच्या पुतण्याने प्रत्युत्तरात शेखवर हल्ला केला असून शेखही ठार झाला. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सांगली पोलिसांची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.
शहरभर पोलीस बंदोबस्त
या घटनेनंतर सांगली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, समाज माध्यमांवर या घटनेची जोरदार चर्चा सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला होता. समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या निर्घृण खुनामुळे सांगली शहराच्या शांततेला गालबोट लागले आहे.
