मयत गौरी गर्जे या हुशार डॉक्टर होत्या. त्या केईएम रुग्णालयात दंत विभागात सेवा बजावत होत्या. घटनेच्या दिवशी शनिवारी देखील त्या नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेल्या होत्या. नोकरीवरून घरी जाईपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होतं. घटनेच्या दिवशी दुपारी गौरी यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या लग्नातील कार्यक्रमासाठी डान्स प्रॅक्टीस केली होती. काम करून घरी परतल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं.
advertisement
केईएम रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, डॉ. गौरी गर्जे या केईएम पालिका रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. सर्वांशी सौहार्दाने वागणाऱ्या गौरी रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या दंतचिकित्सक म्हणून ओळखल्या जात. शनिवारी त्या नेहमीप्रमाणे कामावर उपस्थित झाल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्यांनी एका सहकाऱ्याच्या लग्नातील विशेष कार्यक्रमासाठी थोडा वेळ नृत्याचा सरावही केला आणि त्यानंतर त्या घरी परतल्या होत्या.
घरी गेल्यानंतर गौरी आणि अनंत यांचं कडाक्याचं भांडण झालं. भांडणानंतर अनंत गर्जे हा पंकजा मुंडे यांच्या एका कार्यक्रमासाठी घराबाहेर पडला. त्याची गाडी कोस्टल रोडजवळ असताना गर्जे वारंवार गौरी यांना फोन करत होता. मात्र गौरी फोन उचलत नव्हती. तिच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे अनंत गर्जेने आपली गाडी पुन्हा घराकडे वळवली. त्याने घराबाहेरून जाऊन घराचा दरवाजा ठोठावला. गौरीला हाका मारल्या. हाक देऊनही गौरी दार उघडत नव्हती. आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याने अनंतने खिडकीतून घरात डोकावले. यावेळी गौरी यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती स्वत: अनंत गर्जेनं पोलीस चौकशीत दिली आहे.
